दापोली : आमदार आणि कामगिरी दमदार हे जणू समीकरणच गेल्या सात वर्षात बनले आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दापोली मतदार संघातील कित्येक वर्षे रखडलेल्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. दापोली मतदार संघासाठी तब्बल ४९ वर्षानंतर योगेशदादा कदम यांच्या रूपाने या मतदार संघाला मंत्रीपद मिळाले आहे.
त्या मंत्रीपदाचा खऱ्या अर्थाने उपयोग हा योगेशदादा कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस विकास निधीच्या उपलब्धतेमुळे मतदार संघातील दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील गाव वाड्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यानी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे काम पाहत असताना गेल्या दीड दोन वर्षात कित्येक वर्षे रखडलेल्या विकास कामांना मंजुरी देऊन विकासाचा मागासलेला अनुशेष भरून तर काढलाच आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खेड तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या पोयनार लघु पाट बंधारे योजनेसाठी २६५ कोटी ३८ लाख रुपये तर न्यू मांडवे लघु पाटबंधारे योजनेसाठी १९५ कोटी ९६ लाख एवढा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेल्या महत्वाच्या अशा विकास कामाना तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात ते यशस्वी झाले, ही बाब दापोली मतदार सघासाठी भुषणावह अशीच आहे दापोली तालुक्यातील मौजे दापोली सारंग अडखळ रस्ता, जालगाव ते गावतळे रस्ता, मौजे दापोली सारंग कळबट रस्ता, अडखळ पाज सालदुरे मुरुड कर्दे, लाडघर रस्ता, पालवणी वेरळ उन्हवरे तोंडली विरसई खरवते लहान पुलाचे बांधकाम, ‘पालवणी खेर्डी रस्ता असे दापोली तालुक्यासाठी एकुण १४ कोटी ४५ लाख रुपयांचा विकास निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला आहे.
खेड तालुक्यातील बोरघर वावे तर्फे नातू बौध्दवाडी ते चिंचवली वाडी रस्ता, कुडोशी मांडवे दहीवली घोगरे रस्ता, आंबये शिवतर जामगे सातेरे शिरसाडी सोवेली रस्ता सुधारणा व कमकुवत पुलाची पुनर्बाधणी असा खेड तालुक्यातील विकास कामासाठी ४ कोटी २५ लाख रुपये तसेच मंडणगड तालुक्यातील रेवस रेडी रस्त्याच्या समुद्राच्या कडेने रस्त्याचा पृष्ठभाग उच करणे, धुप प्रतिबंधक बधारा, संरक्षण भिंतीचे बांधकाम तर पुरार म्हाप्रळ मंडणगड रस्ता राष्ट्रीय मार्ग १०१ ची सुधारणा व डांबरीकरण करणे तर मंडणगड पालवणी खेर्डी रस्ता रामा १३७ चे रुंदीकरण व डांबरीकरण अशाप्रकारे मंडणगड तालुक्यातील विकास कामांसाठी एकुण ६ कोटी ३० लाख रुपये विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या पूर्तेचा आलेख हा योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून उचावतच चालला आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील रहिवाशी मंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या दमदार कामगिरीचे समाधान व्यक्त करत आहेत.
