मुंबई : देशभरात (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही.

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना MH – CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींनी कठोर शिक्षा करा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परिक्षा पे चर्चा वर दरवर्षी मोठे प्रवचन देत असतात पण त्यांच्याच कार्यकाळात व्यापम सारखे परिक्षा घोटाळे फोफावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातच परिक्षेत गडबड घोटाळे वाढले आहेत व त्या घोटाळ्यातील लोकांचे संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड झाले आहेत. एमएच सीईटीच्या परिक्षेतील घोटाळ्यावर मी एक्स या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती, त्यावर या परिक्षा घेणाऱ्या सेलकडून यादी अस्पष्ट आहे असा खुलासा करण्यात आला आहे. या यादीतीला विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ती झाकण्यात आली होती. आता मी पुन्हा एमएच सीईटी कमिशनला एक यादी व पत्र देणार आहे, त्यावर त्यांनी खुलासा करावा. एमएचसीईट परिक्षा सेलमध्ये मागील ८-१० वर्षे तेच अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. नीट, एमएच-सीईट सारख्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्य ठरवणाऱ्या असतात त्यात अशा प्रकारे घोटाळे करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असेही सचिन सावंत म्हणाले..