लोटे : – विधान परिषदेचे आमदार मा. श्री. प्रमोद जठार यांनी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, वैभव खेडेकर, राजुभाई रेडीज, विनोद चाळके, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड.राज आंब्रे, रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पटवर्धन, संचालक शिरीष चौधरी, मंदार अडिवरेकर, दत्ताञय जाधव तसेच कंपन्यांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे यांनी त्यांचे स्वागत केले व लोटे परशूराम औद्योगकि वसाहतीला भेडसावणा-या विविध समस्या त्यांचे समोर मांडल्या. लोटे वसाहतीतमध्ये विविध उद्योग करणारे अनेक कारखाने आहेत. त्या उद्योगांना विज, पाणी, रस्ते अशा अनेक मुलभुत सुविधा मिळाव्या यासाठी उद्योजक संघटना काम करत आहे. साधारणतः २५ हजार लोकांना रोजगार या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये मिळत आहे. तसेच सरकारला लोटे औद्योगिक वसाहतीमधून कराच्या स्वरूपात कोट्यावधीचा महसूलही मिळत आहे. युदधजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे परराज्यातून आलेल्या कामगारांचे खुप हाल झाले. अपु-या गॅस पुरवठ्यामूळे कंपनीच्या कॅन्टीन बंद पडल्या, कामगार काम सोडून गेले. यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे औद्योगिक वसाहत व पंचक्रोशीतील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. कंपन्या बंद करण्याची वेळ आली. पाणी प्रश्नासाठी उद्योजक संघटना गेली अनेक वर्षे वाशिष्टी नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्याची सात्यताने मागणी करत आहेत. त्यासाठी २४ कोटी मंजूर झाले आहेत. परंतु पाठबंधारे विभाग याकडे लक्ष देत नाही. तसेच औद्योगिक वसहाती जवळ दोन धरण आहेत त्यातून पाणी व्यवस्था करावी अशी सुद्धा मागणी केली आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष डॉ प्रंशांत पटवर्धन यांनी उद्योजकाला एन्हार्यमेंट क्लिअरंसमधून सुट मिळावी व लघू उद्योजकांना १८ टक्के जिएसटी लावु नये, महावितरणचे सेक्शन ऑफीस अतिरीक्त औद्यौगिक वसाहतीमध्ये व्हावे अशी मागणी केली.
यावर आमदार मा.श्री.प्रमोद जठार म्हणाले की, मी एक पण उद्योजक आहे. त्यामुळे उद्योजकांना सामोरे जाव्या लागणा-या समस्या मला माहीत आहेत. पाणी पुरवठा प्रश्नाबाबत असलेल्या धरणांची माहिती घेतो. पाठबंधारे विभागाचा पाठपुरावा करेन व साधारण महिन्याभरा मध्ये हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन. विज प्रश्नांबाबत अंडरग्राऊड करण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी देण्यात आला आहे. अंडरग्राउंडचे काम पूर्ण झाल्यास विजेचा प्रश्न मोठ्याप्रमाणात सुटेल. तरी औद्यौगिक वसाहतीच्या दृष्टीने कामे मार्गी लावावीत व सेक्शन ऑफीस लवकरात लवकर मंझुर करुन घ्यावे, अशा सुचना महावितरणच्या
अधिका-यांना दिल्या. अनेक लोकांना रोजागार देणा-या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न सोडवणे खुप आवश्यक आहे. मी पुन्हा उद्योजक संघटनेची भेट घेईन व उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.