मंडणगड :*तालुक्यातील घोसाळे गावी शनिवारी सकाळी १० वाजता अंगणवाडी केंद्र घोसाळे येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान पोषण पखवडा ० ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी पणदेरी बीटातील ३६ अंगणवाडी पैकी ३४ अंगणवाडी सेविका, ३२ मदतनीस, १२ पालकवर्ग व १५ विद्यार्थी तसेच गरोदर माता, स्तनदा माता, कीशोरवयीन मुली, शिक्षक वर्ग, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.