चिपळूण (प्रतिनिधी) :- चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ नाव देण्याबाबत नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात चिपळूण शहरातील विविध संस्थांनी आ. शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. तर आ. निकम यांनी शासन-प्रशासनाकडे सातत्यपूर्ण केलेल्या पाठवपुराव्यानंतर शासनाच्या महसूल व वनविभागाने ही मंजुरी दिली आहे. यामुळे विविध संस्थांनी आ. शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.

याची दखल घेऊन आ. शेखर निकम वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे या अनुषंगाने पत्रव्यवहार केला. इतकेच नव्हे तर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. याची दखल घेऊन ना. गणेश नाईक यांनी वनविभागाला तसे निर्देश दिले. यानुसार वनविभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. याची दखल घेऊन शासनाने चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’ नाव देण्याबाबत मंजुरी दिली आहे. यासाठी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांची देखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या निर्णयाबाबत चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.