चिपळूण : विश्व हिंदू परिषद, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ रोजी श्री देव परशुराम मंदिर संस्थान येथे विशेष भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोकजी (अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय) उपस्थित राहणार असून धर्माचार्यांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून भोजनोत्तर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता श्री देव परशुराम संस्थान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विश्व हिंदू परिषद धर्माचार्यांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांचे मार्गदर्शन घेत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन विभाग मंत्री विवेक वैद्य, उदय चितळे, विभाग सहमंत्री बिपीन पाटणे तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किरण पेंडसे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.