चिपळूण : तालुक्यातील कामथे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आज सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक श्री. तानू आंबेकर यांच्या पुढाकाराने तसेच श्री. भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेले वृक्ष जगवण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन कामथे जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दिले.