लांजा : तालुका सभापती पदाची निवड सोमवार दीनांक 9 मार्चला होणार असल्याने सभापती पदी कोणाची वर्णी लागणार,?जुन्यांना पून्हा संधी देणार? की नवीन चेह- याना संधी मिळणार?याकडे लांजा तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. आमदार किरण सामंत यांच्या हातात निवड असल्यामुळे कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडते याबाबत सध्या उत्सुकता लागून राहीली आहे.
       
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पंचायत समीतीचे आठ ही सदस्यावर शिवसेना पक्षाने दणदणीत विजय संपादित केला आहे. त्यामुळे विरोधी कोणी नसल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. सभापती आणि उपसभापती पदी कोणाला बसवयाचे हे आमदार किरण सामंत यांच्याच हातात असल्यामुळे कोणाची वर्णी लागते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. निवडून आलेल्या सदस्यामध्ये दीपाली दळवी-साळवी आणि मानसी आंबेकर यांनी या आधी सभापती पदे भूषविली आहेत. तर रसिका मेस्त्रि व साक्षि चव्हाण नवीन सदस्य आहेत.
 
दरम्यान शिवसेना फुटीच्या आधी लांजा तालुक्याच्या पंचायत समितीवर गेली पंचवीस वर्ष शिवसेनेचे  वर्चस्व होते. आता फुटीनंतर ही शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार कीरण सांमत यांचा शब्द प्रमाण मानून लांजा तालुक्यातील जनतेने शिवसेनेच्या बाजूने विजयाचा कौल दीला आहे. त्यामुळे तालुक्याचा सर्वागिण विकासाची जबाबदारी वाढली असल्याचे बोलले जात आहे.