खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली असून सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. निवडणुकीचे कामकाज पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी पार पाडले.
खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणुकीदरम्यान आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आणि त्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तसेच उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर व उपसभापती सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन त्यांच्या अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा मान दिला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर व उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75