चेन्नई/मुंबई दि. 15 – तामिळनाडुमध्ये द्रमुक सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले, ते रोखण्यास द्रमुक सरकार कमी पडले आहे. तामिळनाडुच्या विकासासाठी एनडीए सरकारशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तामिळनाडुतील द्रमुक सरकार हटवण्याकडे जनतेचा कल आहे. दलित जनता तर द्रमुक सरकारला या निवडणुकीत देणार आहे धक्का त्यामुळे एनडीएचा विजय झाला आहे पक्का. तामिळनाडुच्या विकासासाठी एनडीए आणि रिपब्लिकन पक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज चेन्नई येथे केले.
तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडुक रिंगणात असुन त्यातील चेन्नई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचे 5 उमेदवार हे निवडणुक लढत आहेत. आज चेन्नई येथील रिपब्लिकन पक्षाच्या पाचही उमेदवारांसाठी ना. रामदास आठवले यांनी चेन्नई दौरा केला. यावेळी एकमोर येथे रिपब्लिकन पक्षाची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ना. रामदास आठवले यांचे भव्य स्वागत केले.
