खेड (प्रतिनिधी) : – शहराजवळील भडगांव (उसरेवाडी, नक्षेवाडी) येथील श्रीकृष्ण मंदिराचा रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी श्रीग्रामदेवता खेडजाई, रेडजाई, जाखमातेच्या आशीर्वादाने पाचवा वर्धापनदिन सोहोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी ५ ते ६ – काकडा आरती, सकाळी ९:३० ते १०:३० महाभिषेक, सकाळी ११- श्रीसत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ ते ७ – हरिपाठ, रात्री ७:३० ते १०:३० – महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रुपरेषा असून रात्रौ १० : ३० वाजता संगमेश्वर तालुक्यातील माभळे जाधववाडी फौजदार जावाट येथील वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळाचे नटखट शृंगारिक गवळण व कृष्णलिलासह ” जालंदर दैत्याचा वध ” हे नमन व ” भटकता आत्मा ” हे धमाल विनोदी वगनाट्य यांच्या सादरीकरणाने वर्धापनदिन सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन भडगांव उसरेवाडी, नक्षेवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने केले आहे.
भडगांव येथील श्रीकृष्ण मंदिराचा रविवारी पाचवा वर्धापनदिन सोहोळा !
