चिपळूण : शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा कार्यसम्राट आमदार भास्करराव जाधव यांच्या आमदार निधीतून रावळगाव येथील सुर्वेवाडी–होळीचामाळ पाखाडी विकासकामाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विकासकामाचे भूमिपूजन व शुभारंभ उमरोळी जिल्हा परिषद सदस्य पिंट्या शेठ निवळकर, चिपळूण पंचायत समितीचे शिवसेना गटनेते गौरव पाटेकर तसेच शिवसेना रामपूर विभाग प्रमुख संदीप घाग यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाखाडीच्या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधेत मोठी सुधारणा होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामस्थांनी याबद्दल आमदार भास्करराव जाधव यांचे आभार व्यक्त करत विकासकामांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमास शाखाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य गणपत सुर्वे सुभाष चव्हाण, उपशाखाप्रमुख विलास जाधव, मारुती चव्हाण, शिवाजी जाधव, मोहन जाधव, विजय चव्हाण, श्रीधर चव्हाण, प्रकाश चव्हाण, दीपक सुर्वे, अनंत चव्हाण, प्रभाकर सुर्वे, अमित सुर्वे, मंगेश सुर्वे, गोविंद शिंदे, गोपीनाथ देसाई, एकनाथ सुर्वे भिकाजी सुर्वे सुरेश जाधव, शशिकांत चव्हाण, सविता कदम, शोभा चव्हाण, वैशाली चव्हाण, प्रवीण सुर्वे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या विकासकामामुळे सुर्वेवाडी–होळीचामाळ परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असून भविष्यातील विकासासाठीही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या विकास कामाकरता व मंजूर होण्याकरता व काम लवकरात लवकर चालू होण्याकरता सातत्याने पाठपुरावा श्री शशिकांत चव्हाण समाजसेवक करत होते त्यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले