बारामती : आज इंडिया आघाडीची मिटिंग आहे. आम्ही पुन्हा आठ दहा दिवसांनी प्रमुख लोकांना बोलवून त्यातून मार्ग काढू. मार्ग निघेल याची खात्री आहे. आजची आढावा मिटिंग आहे. या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असं सूत्र ठरवलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रियाताई सुळे या मिटिंगला गेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत त्याचं आऊटकम कळेल. त्यानंतर दिल्लीत बसून त्यातून मार्ग काढून काम करू,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की,तीन वर्ष निवडणुका नाही. त्यामुळे जे हातात आहेत, त्या सर्वांना सोबत ठेवायचं आहे, कर्जमाफीच्या त्यात अटी आहेत. त्या अडचणीच्या आहेत. पण सरकार जेव्हा निर्णय घेतं तेव्हा त्याचं सूत्र लोकांना मान्य नसतं. पण सरकार निर्णय घेत असतं. अशावेळी लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणं याची आवश्यक असतं. मी एवढेच सांगेल,असे आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले.
आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलून कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, त्यातील अटी कशा दुरुस्त होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्द्यात त्यात काही कमतरता आहे म्हणून तो फेकून द्या, ही भूमिका घेण्याची शक्यता नाही, असेही आदरणीय शरद पवार साहेब यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले की,माझ्याकडे रिपोर्ट आलाय. केळी आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तज्ज्ञांची एक टीम आम्ही पाठवली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी पाहणी केली. काय करायची गरज आहे, याचे लेखी निवेदन आमच्याकडे आलं आहे. शास्त्रज्ञ येऊन गेले. बघूया. ते काही आमच्या हातात नाही, असे आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले.
