लांजा: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शजहरात उड्डाण पूलास चार ठिकाणी अंडरपास न ठेवल्यास येत्या २५जूनला संघर्ष समिती रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलन करून सुद्धा शासनाने लक्ष घातले नाही तर लांजा तालुका संघर्ष समिती हाय कोर्टात रिट पिटीशन दाखल करण्यात येणार असे पत्रकार परिषदेत मध्ये सांगितले आहे. अंडरपास न झाल्यास पादचारी व विद्यार्थी स्री पुरुष वयोवृद्ध व्यक्तींना खुप त्रास होणार आहे.
लांजा तहसीलदार, पोलीस टेशन, ग्रामीण रुग्णालयात, पंचायत समिती, येथेजाणे येणेसाठी लांजा हाॅयस्कूलच्या विद्यार्थी यांचेसाठी, एसटी डेपो समोर,उपशेटेवाडी या चार ठिकाणी अंडरपास ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी मागणी करण्यात आली. पण यश आलेले नाही.आता भव्यदिव्य आंदोलन केले जाणार.या साठी कुणबी पत संस्थेच्या शेजारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली या वेळी संघर्ष समितीने दि.२५जूनला मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाणार असे जाहीर केले.
या पत्रकार परिषदेस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.चंद्रकांत परवडी, सुधाकर कांबळे,वसंत घडशी, प्रकाश लांजेकर, सुरेश करंबेळे, रघुनाथ नामये, स्वप्नील उपशेटे, अभिषेक उपशेटे,विजय तोडकरी,मोहन तोडकरी,बबन मयेकर, आत्माराम करंबेळे, अभिजीत राजेशिर्के,बाबा धावणे, भाई चौगुले,नाना मानकर,दाजी गडहीरे, अल्लाउद्दीन नेवरेकर व अन्य नागरिक उपस्थित होते.