पुणे : ‘महाराष्ट्र ज्योतिष परिषद’ या नामांकित संस्थेअंतर्गत ‘ज्योतिष शास्त्री’ परीक्षा घेण्यात येते.
त्या परीक्षेत श्री .सुयोग पटवर्धन गुरुजी यांनी उत्तीर्ण होऊन ज्योतिष शास्त्री ही पदवी प्राप्त केली आहे.
ही परीक्षा अत्यंत कठीण असून अभ्यास आणि संशोधनाचा कस लावणारी ही परीक्षा मानली जाते. 2025-26 मध्ये पुणे येथील त्यांच्या गुरू सौ. ऋतावरी कोल्हटकर यांच्याकडे तीन चार वर्षाच्या अथक ज्ञानार्जनातून ही पदवी प्राप्त केली.
तसेच त्याच्या सोबत कुडाळ येथील श्री . कौशल सुविनय दामले यांनी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन ज्योतिष शास्त्री ही पदवी प्राप्त केली आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्योतिष या विषयातील ज्योतिषशास्त्री सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते.
गणित आणि ज्योतिष शास्त्रात आवड निर्माण झाल्याने तसेच सर्व कामाच्या व्यवस्था, घरातील जबाबदारी सर्व परिस्थिती सांभाळून केलेला सातत्यपूर्ण अभ्यास, समर्पण आणि कठोर परिश्रमांचे हे सुंदर फळ आहे. त्याने मिळवलेले हे यश त्याच्या ज्ञानाची, जिद्दीची आणि चिकाटीची साक्ष देते.
ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणं ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.
सुयोगने यापूर्वीच लौकीक शिक्षण १० वी पूर्ण करून, पुढील सात वर्ष देवरुख मध्ये गणेश वेदशास्त्र पाठशाळेत गुरुकुल पद्धतीने राहून श्री. आचार्य गुरुजींच्या मार्गदर्शनाने पौरोहित्याचे शिक्षण घेतले आहे.
सन २०१३ ला ते शिक्षण पूर्ण करून पुन्हा दहा वर्षांनी ज्योतिषाचे शास्त्रानुसार शिक्षण घेतले. या अत्यंत खडतर ज्योतिष शास्त्री ही परीक्षा देणं ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे.
या परीक्षेसाठी प्राज्ञ आणि विशारद या दोन परीक्षा द्याव्या लागतात. परंतु त्याने थेट ज्योतिष शास्त्री ही अंतिम परीक्षाच दिली आहे.
पंचागामधील गणित अभ्यास (पंचांग तयार करण्यास आवश्यक असे), नवमांश मांडणे, वर्ग कुंडल्या, जैमिनी सूत्र , महादशा काढणे, कुंडली तयार करणे याबरोबरच फलज्योतिष, मेदिनीय ज्योतिष, प्रश्न कुंडली, हस्तरेषा, वास्तुशास्त्राचा अभ्यास तसेच कृष्णमूर्ती पद्धत, यांचाही अभ्यास करावा लागला. अनेक पद्धतीनी शेकडो कुंडल्या हाताने मांडून अभ्यास केला होता.
त्या परीक्षेत किमान १७०+ पत्रिकांचा अभ्यास करावा लागला. याशिवाय परीक्षेचा फाॅर्म पण भरता येत नाही.
बारावीच्या धर्तीवर हाॅल तिकिट घेत, तीन तासाचे तीन परीक्षा पेपर सोडवावे लागले. वेगवेगळ्या पद्धतीनी अभ्यास करून स्वतःचे संशोधन प्रबंध सादर करावे लागतात.
सुयोगने यासाठी दिव्यांग, मानसिक रुग्ण यांच्या पत्रिकांचा विशेष प्रबंध सादर केलेला होता. हाताने अंकगणित करून, पत्रिका मांडून, प्रगत तंत्रज्ञानाचा जसे संगणक वापर न करता, केलेला अभ्यास हा कायमस्वरूपी उपयोगी ठरणारा असतो.
त्याने मिळवलेल्या या ज्ञानाचा वापर आता अनेक क्षेत्रात होणार आहे. राजकीय ज्योतिष, आरोग्य अनारोग्य विषयक, संततीविषयक समस्या, फलादेश, पूर्व जन्मातील व्याधी, ग्रहबाधा, सामाजिक समस्या सोडवणे, शिक्षणाची दिशा कशी असावी, विवाह गुण मेलन, इ. अनेक समस्यांकरिता होणार आहे.
पाऊस पाणी हवामान आणि वातावरणाचा अंदाज, एखाद्या देशाचे राजकीय भविष्य वर्तवणे, परदेश गमन, व्यवसायात स्थिर होणे, व्यक्तीमत्व विकास, वस्तु हरवणे सापडणे इथपासून जन्म आणि मृत्यु याविषयावर टीप्पणी करण्याचा अधिकार या परीक्षेने त्याला प्राप्त झाला आहे.
परीक्षे मध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकांचा नाव माहित नसताना, अभ्यास करून त्या पत्रिकेची सर्व गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीमत्वामधे कशी आढळतात, मृत असलेल्या पत्रिकेच्या जातकांचा मृत्यु नेमक्या कोणत्या कारणांनी झाला असावा, याचाही उलटा अभ्यास त्याला या परीक्षेसाठी करावा लागला.
या परीक्षेकरीता २६६ परीक्षार्थीमध्ये फक्त 48 जण प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
