जळगाव:- आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
काही दिवसांपूर्वी सभापती राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात जाहीर धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. यावरून रोहिणी खडसे धोंडे जेवणाऐवजी रोजगार मिळावा आयोजित करा असा सल्ला राम शिंदे यांना दिला होता. यावरून राम शिंदे यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली. या टीके रोहिणी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
रोहिणी खडसे यांनी एक पोस्ट टाकली आहे त्यात त्या म्हणाल्या की, आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली. मग धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारल्या. यांचं हिंदुत्व किती दुटप्पीपणाचे आहे बघा…हे गुंडांना पोसतात, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत करतात. ज्या गुंडांनी असंख्य लोकांची हत्या केली, अनेकांना त्रास दिला, त्यांना हे मदत करतात. आपला हिंदू धर्म हे सांगतो का ? नाही !
निलेश घायवाळ, युवराज काशीद आणखी किती नावे घेऊ ? ज्यांना या धोंड्याने मदत केली आहे. मी जर यांची कुंडली काढायचं ठरवले तर राजकारणाला ‘राम-राम’ करावा लागेल असा टोला त्यांनी लगावला
