चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका येथे कोकणदीप मेडिकलसमोर २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातप्रकरणी चिपळूण पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सचिन अनंत भोजने (वय ४५, रा. भोम गावळवाडी, चिपळूण) हे आपल्या मारुती सुझुकी डिझायर कारने खेडीकडे जात होते. त्याचवेळी आरोपी अमोल सुनील लोंढे (वय २६, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) हा महिंद्रा बोलेरो पिकअप चालवत मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाक्याकडून गोव्याच्या दिशेने जात होता.
आरोपीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव चालवून फिर्यादींच्या डिझायर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम २८१ व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.