मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विचार मला पटवून सांगितले तर मी भाजपात प्रवेश करेन, असे म्हणणारे जनाब संजय राऊत सन 2014 ते 2019 मध्ये पार तोंड फुटेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कसे देशहितासाठी काम करत आहेत, हे जाहीर भाषणांमधून महाराष्ट्राला सांगत होते.

संजय राऊतांना विस्मृतीचा आजार झाला असला तरी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे केलेले कौतुक महाराष्ट्र विसरलेला नाही. 2019 नंतर मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार बाजूला ठेवला याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी सोमवारी निर्भत्सना केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत सन 2014 ते 2019 या काळात तुम्ही जे काही भजन गात होता ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी होते. आज तुम्ही काँग्रेसचे गुणगान आणि राहुल गांधींचे भजन गाता आहात. कारण तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी हवी आहे. परंतु लक्षात घ्या, तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपाचे तोंड भरून कौतुक होता हे महाराष्ट्र पुन्हा एकदा आठवतोय, याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.