चिपळूण : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज सह्याद्री शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आदरातिथ्य केले. तसेच संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याची सविस्तर माहिती त्यांना दिली. भेटीदरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले व श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी आमदार किरण उर्फ भैया सामंत, बंटी पाटील, नितीन कुलकोल, उद्योजक सचिन पाकळे, उद्योजक संजय पाकळे संस्थेचे सचिव महेश महाडिक, संचालक गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, प्रा. सुनितकुमार पाटील, प्रा. मंगेश भोसले, प्रा. तानाजी कांबळे, प्रा. माणिक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
