देवरुख : आज देवरुख येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा निरीक्षक विजयराव देसाई उपस्थित राहून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विजयराव देसाई यांनी जिल्ह्यातील पक्षाची सद्यस्थिती, आव्हाने व आगामी रणनीती यावर चर्चा केली. पक्ष बांधणीसाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन करत, कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.