मुंबई : देशाला आग लागावी, वणवा पेटावा अशी संजय राऊत यांची कितीही सुप्त इच्छा असली तरी या देशात आग लागणार नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जातो आहे. मात्र ते होणार नाही. या विधेयकाद्वारे महिलांचा सन्मान होऊ नये, असा संजय राऊत यांचा मनसुबा असला तरी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संसदेत मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. या विधेयकाच्या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा एकदा एकवटेल आणि तुम्ही मात्र तोंडावर पडाल, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.