.मुंबई : क्रिकेट हा सांघिक, संयम व खिलाडू वृत्तीने खेळला जाणारा जागतिक दर्जाचा खेळ आहे. एकजूट असली की यश कसं मिळत हे या खेळात दिसून येत. युवकांना एकत्र आणणे, समाजात चांगलं सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करणं हे रुपेश पाटील, निकिता पाटील व सर्व सहकाऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे. ही भव्य स्पर्धा मनाला आनंद देणारी असून भविष्यात देखील ही स्पर्धा अधिक ताकतीने व भव्य स्वरूपाची व्हावी अशा शुभेच्छा बेलदार भटका समाज (ओड)महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तथा भाजप नेते राजुभाऊ साळुंके यांनी याप्रसंगी दिल्या .

मनसे चषक” ही रायगड जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा नुसती क्रीडा पूर्ती मर्यादित नसून सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं नाव असणारी स्पर्धा आहे. ग्रामीण भागातील उदयोन्मुख व होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा खेळाडू , क्रीडा रसिक व मान्यवरांसाठी पर्वणी असते. या भव्य , देखण्या व वैभवपूर्ण स्पर्धेचे सदाबहार आयोजन निकीताताई पाटील व रुपेशदादा पाटील यांच्याकडून अचूक केलं जातं. सचिन तेंडुलकर स्टेडियम पेण येथील मनसे चषक” 2026 या स्पर्धेच्या शेवटच्या पारितोषिक वितरण दिवशी बेलदार भटका समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भाजप नेते राजुभाऊ साळुंके यांची दमदार एन्ट्री पहावयास मिळाली. राजूभाऊ साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून मोठा जल्लोष करण्यात आला. तर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी ही करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांसाठी बक्षिसांची अक्षरशः खैरात होती. राजविर 11 भवानी फायटर रावे संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. रमेश स्मृती महागणपती चिरनेर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. शिवशंभो पाटनेश्वर तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक ग्रीष्म 11 मोठी जुई या विजेत्या संघांना रोख रक्कम , आकर्षक चषक, आकर्षक बक्षिसे देऊन गौरविले. सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील पाटील, सर्वोत्कृष्ट गोलंदाज दीक्षित पाटील, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल वाघ या खेळाडूंना गौरविण्यात आले. लकी ड्रॉ उपक्रमात प्रेक्षकांसाठी खास स्कुटी भेट देण्यात आली.

यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर, महिला, वकील, डॉक्टर इंजिनिअर , उद्योजक तसेच हजारो क्रीडा रसिक उपस्थित होते.