महाराष्ट्राचे लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल लवकर जाहीर करण्याची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन.

अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय आणि सीआयडीमार्फत सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसह सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.