खोपोली (जयवंत माडपे /अतुल साळवी): मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील शिळफाटा इंदिरा गांधी चौकातील रिक्षा स्टॅन्ड जवळील संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तेथील ओपन गटारावर स्लॅब टाकण्यात यावा अशी रिक्षा संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे.

 मुंबई पुणे जुन्या महामार्गावर शिळफाटा चौकात मोठ्या प्रमाणात रहदारी असते, इथूनच पनवेल, पाली, पेण व इतर औद्योगिक भागात जाण्यासाठी रिक्षा स्टॅन्ड असून हजाराहून अधिक प्रवासी येथून वेगवेगळ्या भागात प्रवास करीत असतात. या चौकात पुण्याहून आलेले एसटीने प्रवासी येथूनच रिक्षाने प्रवेश करीत असतात. चौकात मोठ्या प्रमाणात अहोरात्र वर्दळ  असते. काही वर्षांपूर्वी या चौकात भीषण अपघात झाला होता व त्यात अनेकांचे जीव गेले होते, या कारणास्तव संभाव्य अपघाताचे ठिकाण असलेले ओपन गटार तातडीने स्लॅप टाकून बंद करण्यात यावे अशी मागणी रिक्षा संघटनेतर्फे करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनीही या संदर्भातली मागणी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे केली आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY