मुंबई : आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनतर्फे माहितीचा अधिकार (RTI) व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकतेचा अभाव, संविधान व लोकशाही संरक्षण, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.

देशभरात माहितीचा अधिकार वापरून भ्रष्टाचार उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्यांवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या व विविध प्रकारचा दबाव वाढत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, तसेच भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाही बळकटीकरण, पारदर्शक प्रशासन, मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे.