मुंबई : राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे.
या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे मुख्यालय दादरच्या टिळक भवनमध्ये दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत ओबीसी, अल्पसंख्याक, एस.सी. व सोशल मीडिया विभागासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.