मुंबई : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रवहिनी पवार आणि खासदार श्री पार्थ पवार यांनी VSR च्या विमानाने प्रवास केल्याच्या काही बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित करण्यात येत आहेत. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. संबंधित वृत्त पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे आणि वस्तुस्थितीला धरून नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रसारमाध्यमांनीही कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, ही अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केली.
सुनेत्रावहिनी आणि पार्थ पवार यांनी व्हीएसआरच्या विमानाने प्रवास केल्याची बातमी तथ्यहीन..!
