चिपळूण: शहरातील पागझरी रोड येथील श्री साई नवयुवक मित्र मंडळातर्फे गुरुवार दि.२६ मार्च रोजी श्री साई भंडारा व राम नवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
चिपळूणच्या पागझरीरोड श्री साई मंदिरात २५ मार्च रोजी सकाळी श्रींची पूजा, श्री साई चरित्राचे पारायण, श्रींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक,श्री साई सेवा भजनी मंडळाचे भजन असे कार्यक्रम होणार आहे. तर २६ मार्चला पहाटे काकड आरती, श्रींची शोडशोपचार पूजा, श्री सत्यनारायण पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी धुपारती आणि खेड सोनगाव संघ वारकरी संप्रदायाचा हरिपाठ तसेच रात्री दहा वाजता श्री त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ कला मंच सामूहिक ग्रुप चिपळूणचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविक भक्तांनी श्री साई भंडारा व रामनवमी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
