कणकवली : शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कणकवली नरडवे रोडवरील मुडेश्वर मैदाना समोरील मोहन मळा भागात त्यांचा मृतदेह सकाळी स्थानिकांना आढळून आला. दळवी यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार केल्याचे तसेच डोक्याच्या मध्यभागी बंदुकीची गोळी लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. खुनाच्या या घटनेने कणकवलीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून
