लोटे : मंगळवार दि.१८ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज अंबडस येथे तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्यात कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे ची आठवी ब ची विद्यार्थिनी मेरा महेंद्र साळुंखे तिने प्रथम क्रमांक पटकावला असून लोटे पंचक्रोशी सह तालुक्यामधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज एमआयडीसी येथे तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा भरविण्यात आला होता.या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १८ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात कविता विनोद सराफ हायस्कूलची इयत्ता आठवी ब ची विद्यार्थिनी कुमारी मीरा महेंद्र साळुंखे हिने “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ – संधी व आव्हाने” या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले व तिने प्रथम क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय आणि प्रभावशाली प्रेझेंटेशन मुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तिला सौ. प्रेरणा प्रवीण चव्हाण मॅडम , श्री एन एस जाधव सर,श्री देवरुखकर सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत जी चाळके, संस्थेचे सेक्रेटरी श्री वारणकर सर, शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन तसेच नूतन प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष श्री राजू भाई रेडीज तसेच संस्थेचे सर्व संचालक, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात कविता विनोद सराफ हायस्कूलचे उल्लेखनीय यश…
