शिरगाव : दापोली मधील व्यापारी अनिल मोरे यांची 29 मार्च रोजी चारचाकी गाडी दोन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल झाला त्यानुसार पोलिसांनी तपासणीची चक्रे फिरवली आणि गुहागर विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन या ठिकाणी आलोरे शिरगाव पोलीस यांनाचार चाकी गाडी दिसून आली त्यानुसार त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात संपर्क केला आणि फिर्यादी अनिल मोरे यांना घेऊन दापोली पोलीस शिरगाव पोलिसात दाखल झाले त्यानंतर हीच गाडी असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी सदरची गाडी ताब्यात घेतली आहे एका दिवसात तपास लावल्याबद्दल फिर्यादी अनिल मोरे यांच्याकडून दापोली पोलीस यांचे कौतुक होत आहे
याबाबत सविस्तर वृत् असे की दापोली मधील व्यापारी अनिल मोरे यांनी 28 मार्च रोजी दिवसभर आपला व्यवसाय करून रात्री आपल्या फ्लॅटच्या खाली पार्किंग मध्ये उभी केली होती मात्र सकाळी त्याला गाडी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाणे गाठले आणि गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली त्यानुसार दापोली पोलीस यांनी परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले यावेळी दुचाकीवरून दोन व्यक्ती त्या गाडीपाशी आहे एकजन चारचाकी गाडी घेऊन निघून गेला तर दुसरा व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसला त्यानुगर पोलिसांनी तपास सुरू केला
तपासनुसार सदरची चार चाकी गाडी गुहागर विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन याठिकाणी एका वळणावर उभी असल्याचे शिरगाव पोलिस यांना दिसले त्यांनी तात्काळ दापोली पोलिस यांना माहिती दिली आणि फिर्यादी अनिल मोरे यांना बरोबर घेऊन दापोली पोलिस यांनी शिरगाव पोलिस ठाणे गाठले आणि त्या गाडीची खातरजमा करून रीतसर पंचनामा करून गाडी मोरे यांच्या ताब्यात दिली मात्र गाडीची चोरी करणारे ते दोन अज्ञात इसम कोण याचा तपास दापोली पोलिस करीत आहेत..