चिपळूण : आर्ट ऑफ लिव्हींगचं हॅप्पीनेस प्रोग्राम हे शिबीर दि. २५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत संपन्न झालं. रोजच्या कामाचा वाढता व्याप, धकाधकीच्या जीवनात आपली कार्यक्षमता टीकवणं, तणाव मुक्त जीवन पद्धती याचा अनुभव समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी घेतला. या शिबिरात पोलिस अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, काॅर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदाधिकारी सहभागी होते. या सर्वांनी आनंददायी जीवन पद्धतीची सुत्र, उर्जापूर्ण सूदर्शनक्रिया, सकारात्मक दृष्टिकोन तंत्र यांचा हसतखेळत अनुभव घेतला. शेवटच्या दिवशी अतिशय सुरेल सत्संग झाला.
या शिबारात जागतिक किर्तीचे आर्ट ऑफ लिव्हींगचे शिक्षक मुंबईचे श्री. अमोलजी वागळे यांनी मार्गदर्शन केले. यानंतरचे पुढील शिबीर दि. १ मे २०२६ ते ५ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. संपर्क (डाॅ. सुधा भारद्वाजन- 7276666480)
