चिपळूण : दि. ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते हंबीरराव मोहिते यांना स्वराज्याच्या सरसेनापती पदावर सन्मानपूर्वक विराजमान करण्यात आले. ही दैदिप्यमान ऐतिहासिक घटना दळवटणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे घडली. सुमारे ३५० वर्षांचा वारसा लाभलेल्या या सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या घटनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास हंबीरराव मोहिते यांचे थेट वंशज, इतिहास संशोधक मा. श्री. विक्रमसिंह मोहिते (पुणे) तसेच ऐतिहासिक अश्व व अश्वदल संशोधक मा. श्री. गुणेश पुरंदरे (पुणे) यांची विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभणार आहे. तरी, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. बुधवार, दि. ०८ एप्रिल २०२६ , वेळ – सकाळी ११.३० वा. ,स्थळ – शिवगड, नलावडेवाडी, दळवटणे, ता. चिपळूण ,आ. विनीत, सरसेनापती हंबीरराव मोहिते स्मारक समिती (नियोजित) ,दळवटणे–चिपळूण–पुणे
About The Author
Related Posts
Recent Posts
- लक्ष्मी विरोधातील आंदोलन कर्त्यांची १३५ दिवसांनी प्रशासनाकडून दखल-खेडचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी घेतली भेट
- महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक व प्रोत्साहनपर क्रीडा वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार – आमदार चित्रा किशोर वाघ
- अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होताच रोह्यात जल्लोष…
- लांजा नगरपंचायतीची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू…
- अनिकेत तटकरे यांचा विजय दादांना समर्पित ;आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई – सुनिल तटकरे