चिपळूण- चिपळूण नगर परिषदेच्या विविध भूमिपूजन सोहळ्याच्या साठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत चिपळूण येथे आले होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी 200 आसनी मिनी नाट्यगृह चिपळूण ला द्यावे अशा प्रकारची मागणी केली. तो संदर्भ धरून उदय सामंत यांनी आपल्या भाषणात याबाबतचा उल्लेख केला. ते म्हणाले रत्नागिरी शहरांमध्ये 300 आसनांच मिनी नाट्यगृह उभारण्यात आले आहे. तसेच नाट्यगृह चिपळूण मध्ये व्हावे अशी मागणी डॉ.प्रशांत पटवर्धन यांनी केली आहे. रत्नागिरी प्रमाणेच चिपळूण मध्ये सर्व व्यवस्था हव्यात अशी इथल्या लोकांची इच्छा दिसते. रत्नागिरीप्रमाणेच चिपळूणमध्ये सुद्धा 200 आसनांचे मिनी नाट्यगृह करण्यात येईल. चिपळूण मध्ये विकास कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी आमदार शेखर निकम नगराध्यक्ष उमेश सकपाळ उपनगराध्यक्ष प्रा. दांडेकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रशांत यादव, उदय पंडित नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि शहरातील मान्यवर तसेच साहित्यिक कवी उपस्थित होते.
चिपळूण ला मिळणार 200 सीटचे मिनी नाट्यगृह
