चिपळूण : तालुक्यातील मुंबई-गोवा हायवे वर बहादूरशेख-कळंबस्ते नविन वाशिष्ठी पूल बांधण्यात आले आहेत याला पाच वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत तरी ठेकेदार कंपनीने अंदाजपत्रकात लाइट लावण्याची तरतूद असतानाही आजतागायत लाइट लावले नाहीत यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की लाइट नसल्याने अंधाराचा फायदा घेत कचरा व माछी-चिकन चा खराब माल टाकला जात आहे तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या च्या संबंधित अधिकारी व ढेकेदार कंपनी ने ताबडतोब पुलावर लाइट लावण्याची व्यवस्था करावी अन्यता रस्ता रोको करू असे चिपळूण पंचायत समिती माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी मुंबई-गोवा हाईवे च्या अधिकाऱ्यांना कळविले आहे .