चिपळूण : आज भाजप चिपळूण शहर मंडळाच्या वतीने भाजप स्थापना दिनानिमित्त रामतीर्थ स्मशानभूमी संपूर्ण स्वच्छ करण्यात आली. यावेळी चार ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला व पूर्ण स्मशानभूमी पाण्याने धुवून काढण्यात आली.

भाजपचा ४६ वा स्थापना दिवस विविध जनोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत रामतीर्थ स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी पालापाचोळा, हार, गवत, बाटल्या, धूळ पूर्णपणे झाडून डिटर्जंटचा वापर करून फिनेल टाकून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका शीतल रानडे, सरचिटणीस सारिका भावे, अभय चितळे, मधुकर निमकर, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, स्वाती देवळेकर, निखिल किल्लेकर, विलास चव्हाण, महेश दीक्षित, अमोल तटकरे, कुणाल आंबेकर, प्राजक्ता टाकळे, श्रीमती जोशी व अभिषेक जागुष्टे उपस्थित होते.