खडपोली : श्री चक्रण मंदिर देवस्थान, खडपोली येथे चैत्र शके १९४८, कृष्ण पक्ष, शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह सर्वांनी या शुभकार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे — शुक्रवारी सकाळी ८ ते १० वा. अभिषेक व होमहवन, सकाळी १० ते ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, तसेच सकाळी १० ते दुपारी २ वा. गुरुकृपा मेडिकल (प्रो. प्रा. अभिषेक रमेश जाधव) व एजिस हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

दुपारी १२.०० ते २.०० वा. ह. भ. प. अश्विन अविनाश साळवी महाराज, नागावे यांचे संगीत भजन होईल. दुपारी २.०० ते ३.०० वा. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नामसप्ताह होईल. दुपारी ३.०० ते ४.०० वा. ज. न. म. प्रवचनकार सौ. सिद्धीताई गणेश दुर्गवली, श्रीक्षेत्र नाणीजधाम यांचे प्रवचन होईल.

सायंकाळी ५ ते ७ वा. भजन व हरिपाठ (वाकणवाडी, तांबटवाडी महिला मंडळ व ग्रामस्थ), सायंकाळी ७ ते ९ वा. ह. भ. प. कु. ईश्वरीताई येसरे, कळंबणी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. रात्री ९ नंतर महाप्रसाद होईल. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खडपोली ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.