मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यम प्रमुखपदी श्री. गोविंद येतयेकर यांची तसेच सह-माध्यम प्रमुखपदी श्री. ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री. गोविंद येतयेकर व श्री. ओमप्रकाश चौहान यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस सुनील राणी तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
