मुंबई : इंडियन एक्सप्रेसच्या खळबळ जनक वृत्तानंतर निवडणूक आयोगांने व्होटचोरी च्या माध्यमातून केलेला घोटाळा उघडकीस आला आणि देशभरात संतापाची लाट उसळली. निवडणूक आयुक्त यांची उचल बांगडी करून त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी देशभरातून जोरदारपणे केली जात असून यासाठी देशभरामध्ये मोर्चे, आंदोलने ठिकठिकाणी सुरू आहेत.
चिपळूण मध्ये बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे नियोजन आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. स्वतः भास्कर शेठ मी हुसेन भाई यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी या मोर्चासाठी उपस्थिती दर्शवली असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मोर्चामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या सर्व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हा काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग आणि मोर्चाचे निमंत्रक भरत लब्दे यांनी दिली.
लोकशाही धोक्यात आणणारी व्होटचोरी, स्त्रियांवरील अत्याचार, गगनाला भिडलेली महागाई, वातावरणातील बदलामुळे दुष्काळाचे सावट, खताच्या, बियाणांच्या वाढत्या किमतीयामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी. या शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार दाखवत असलेली उदासीनता त्यामुळे प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. आवश्यक शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या संधी मिळत नसल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात चीड निर्माण झाली आहे.
त्यामुळे हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात मोर्चाला उपस्थिती दाखवतील आणि हा मोर्चा अभूतपूर्व होईल असा विश्वास भरत लब्ध्ये यांनी व्यक्त केला आहे.