चिपळूण : डी.बी.जे. कॉलेज, स्वायत्त, चिपळूण येथील सेमिनार हॉलमध्ये सोमवारी “कारगिल विजय दिवस” मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून NCC Air Wing “C” Certificate धारक श्री. निखिल जयवंत गावड सर उपस्थित होते. गावड सर यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त, कर्तव्य आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन वातावरण देशभक्तीने भारून टाकले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माधव एस. बापट होते. उपप्राचार्य श्री. चेतन आठवले व उपप्राचार्या सौ. ऋचा खवणेकर यांचीही उपस्थिती होती. सांस्कृतिक भागात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला उपस्थितांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 6 बटालियन NCC च्या प्रमुख मेजर नम्रता माने मॅडम व 19 बटालियन NCC चे प्रमुख लेफ्टनंट मधुसूदन माने सर यांनी परिश्रम घेतले. शेवटी मेजर माने मॅडम यांनी आभार मानले. NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण येथे “कारगिल विजय दिवस” उत्साहात साजरा…
