रत्नागिरी : जिल्ह्यातील तोणदे गावात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध आंबा व्यापारी रुपेश नागवेकर यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापारी क्षेत्रासह स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर तोणदे गावासह संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. रुपेश नागवेकर हे मनमिळावू आणि हसमुख स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार, व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.