मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाहीय. बाळासाहेबांनी हिंदुत्वावर शिवसेना उभी केली. संजय राऊत यांनी सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य होत हा क्लब चालवण्याचे काम केले.

तुम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत आणि ज्यांनी विचार सोडलेले असतात त्यांना समाजात काहीही किंमत नसते हे जनतेने दाखवून दिले आहे. तुमची विचारशून्यता लक्षात आल्याने उबाठा गटाला घरी बसवण्याचे काम लोकांनी केले. एकाच ठाकरे नावाला किंमत होती ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. संजय राऊतांच्या नावाला काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली. श्री. बन म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन केल्याने संजय राऊतांना लगेच मिरच्या झोंबल्या. तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी एकही चांगले काम करू शकत नसल्याने त्यांचे अभिनंदन कोणी करणार नाही.