चिपळूण : चिपळूण नागरी सह. पतसंस्था लि., चिपळूण या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त चिपळूण नागरी परिवाराचा स्नेहमेळावा व सहकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, सहकार भवन, सहकार सभागृह, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे संपन्न होणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. एस. बी. पाटील (सेवानिवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई) आणि श्री. तानाजी कवडे (माजी सहनिबंधक लेखा परीक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.

तरी सदर समारंभास संस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार व सहकारातील कार्यकर्त्यांनी अगत्याने उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व संचालक व कर्मचारी परिवार, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. व चिपळूण नागरी परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.