चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील असंख्य ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 13) सायंकाळी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. स्थानिक विकासाच्या नव्या अपेक्षा आणि परिवर्तनाच्या दिशेने आम्ही नवे पाऊल टाकत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली. भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः!’ या मूल्यांवर चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाचा घटक आपण झाला आहात. त्यामुळे यापुढे आपल्या गावच्या विकासासाठी कोणतीही कमतरता आपल्याला भासणार नाही, अशी ग्वाही यावेळी प्रशांत यादव यांनी दिली.
खेर्डी येथे स्वामिनी निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले आदी उपस्थित होते. यावेळी मांडकी गावातील रत्नू धाकटू खांबे, अमोल रत्नू खांबे, अशोक बाबाजी खांबे, वसंत बाबाजी खांबे, हिरू बाबाजी खांबे, तानाजी बाबाजी खांबे, अरुण बाबाजी खांबे, मानसिंग तुकाराम खांबे, किसन तुकाराम खांबे, कुलदीप मानसिंग खांबे, गंगाराम भागोजी खांबे, प्रदीप गंगाराम खांबे, पार्थ प्रवीण खांबे, प्रित प्रदीप खांबे, प्रतिक सुभाष बांद्रे, संतोष तुकाराम गावणंग, सिताराम बारकू गावणंग, गंगाराम रावजी मोरे, अथर्व दिनेश खांबे, अमर काशिराम खांबे, भरत काशिराम खांबे, प्रदीप बाबाजी खांबे, रामजी दौलत खांबे, मनोहर रावजी खांबे, पियुष मनोहर खांबे, बारकू सोमा खांबे, अन्वेष महेंद्र मोरे, आयुष महेंद्र मोरे, सुभाष रावजी मोरे, अशोक वरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भारत माता की जय… भारतीय जनता पार्टीचा विजय असो… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी प्रशांत यादव यांनी मांडकीतील ग्रामस्थांशी दिलखुलास चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील समस्या आणि अडीअडचणी सविस्तर मांडल्या. आपली एकजूट कायम ठेवा, ग्रामस्थांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने भाजप आणि मी उभा असेन, असे आश्वासन यावेळी प्रशांत यादव यांनी दिले.
मांडकीतील असंख्य ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश….
