गुहागर : गुहागर आगारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री स्वप्निल शिंदे यांनी सांगितले की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेला व देशाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचाराने प्रत्येकाने प्रगती करावी. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खूप मोठे आहे ते समजून जाणून घेणे आवश्यक आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून अप्रतिमान पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
संपन्न झालेल्या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी, प्रवाशी वर्ग,अधिकारी वर्ग,गुहागर तालुका प्रवासी संघटना,गुहागर पोलीस ठाणे आदींनी अमूल्य सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आर बी गायकवाड यांनी आभार मानलेआहेत. गुहागर तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहाने 135 व्या जयंतीचा कार्यक्रम प्रचंड उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
