गुहागर: येथील आगारातील मुख्य कार्यालयात आज जिल्हा व्यवस्थापक श्री बोरसे व आगार प्रमुख श्री चव्हाण व स्थानक प्रमुख श्री शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीतीत नियोजित प्रवाशी राजा दिन मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थिती त होते प्रामुख्याने गुहागर तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशी जनतेच्या समस्या यासह आगारातील अंतर्गत समस्या व त्यावर उपाय योजना या बाबत सखोल चर्चा करण्यात आली व त्यावर अधिकारी यांचे मार्फत आवश्यक सुधारणा करण्याचे वचन देण्यात आले.
गुहागर आगारातून तालुक्यातील जनतेसाठी गुहागर ते बदलापूर ही रातराणी सेवा चालू करण्याचा निर्णय झाला तसेच गुहागर ते कोल्हापूर ही दुपारची गाडी पुन्हा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली तसेच तळी वरून सुटणारी 8/35 ची पेवे पांगारी ही सेवा नियमित करण्याचे ठरले
प्रवाशी जनतेला सहकार्य करावे असे यावेळी जनता दरबारात स्पष्ट करण्यात आले शेवटी उपाध्यक्ष श्री मनोज पावसकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना
