चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल कॉलेज JEE/NEET या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी JEE mains 2026 च्या पहिल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करीत JEE Advance च्या परीक्षेसाठी पात्रता प्राप्त केली आहे. या त्यांच्या उत्तम यशामुळे कॉलेजचा लौकिक वाढला आहे.
यामध्ये कु. अक्सा चौगुले हिने 98.1 पर्सेंटाईल गुण मिळवित विशेष यश मिळवले असून कु. सफवान म्हातारनाईक यांनी 91.23 पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत तर कु. साश्वी मिश्रा या विद्यार्थिनीने 90.38 पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. त्यांच्या या यशामुळे रिगलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यातील IITians म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.
रिगलने JEE/NEET सारखा अभ्यासक्रम सुरू केल्याने कोकणातील विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, लातूरला जाण्याची गरज नाही.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी JEE/NEET या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला देखील सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचा व पालकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी रिगल कॉलेज कोंढे गुहागर रोड चिपळूण येथे 8329104876, 7768988684, 8459026192 संपर्क करावा.
