मुंबई. दि.२४: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा तसेच वेग व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांबाबत परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी विधानपरिषद उपसभापतींच्या दालनात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचेसमोर सविस्तर सादरीकरण केले .महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल, जागरूकता आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महिलांच्या पुण्यातील सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधा सुधारण्यावर भर; लवकरच उच्चस्तरीय बैठक घेणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
