आगरवायंगणी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली येथे शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापक मधुकर मोरे यांचे हस्ते करण्यात आली.
यानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा संदेश या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या दोन महान विभूतींच्या कार्याचा परिचय झाला. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळाली. स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शेवटी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास व सामाजिक जाणीवा विकसित होण्यास निश्चितच मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम सूत्रसंचालन मालवी मोरे यांनी केले कार्यक्रम नियोजन सजावट इ. 7 वी ब चे विद्यार्थ्यांनी केले होते.