पेण : पेणचे युवा समाजसेवक तथा वक्रतुंड मित्रमंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात मदर टेरेसा इंग्लिश मीडियम हायस्कूलला ३० लाकडी बेंचेसची भेट देण्यात आली , तर पेणमधील पत्रकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षणाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्याधिकारी जीवन पाटील, शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, पोलीस अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंगेश वाकडीकर यांनी दत्ता कांबळे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत शिक्षण व पत्रकारितेसाठीचे त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
मुख्याधिकारी जीवन पाटील यांनीही त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.